{ Page-Title / Story-Title }

News Marathi

कानभट पोस्टर – वेद आणि विज्ञान यामधले नाते अपर्णा होसिंग आपल्या पहिल्याच चित्रपटात उलगडणार

Read in: English


फॅशन मॉडेल भव्य शिंदे या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. चित्रपटात ते खूप वेगळ्या अवतारात दिसतील.

Our Correspondent

गेल्या वर्षी रिलीज झालेल्या दशेहरा या हिंदी चित्रपटाची निर्मिती अपर्णा होसिंग यांनी केली होती. आता त्या मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. दिग्दर्शक म्हणून कानभट हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.

फॅशन मॉडेल भव्य शिंदे या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. चित्रपटात ते खूप वेगळ्या अवतारात दिसतील.

पोस्टरमध्ये आपल्याला शिंदे स्टडी टेबल वर अभ्यास करताना दिसत आहेत. तिथे काही वैज्ञानिक प्रयोगामध्ये वापरली जाणारी साहित्य आहेत, कंदील आहे, शाईपेटी आणि पेन आहे. यावरून असे वाटते की त्याला भारतीय पौराणिक साहित्याचे खूप ज्ञान आहे.

चित्रपटाविषयी बोलताना होसिंग म्हणाल्या आताच्या काळात मराठी चित्रपटसृष्टी नव्या उंचीवर पोहोचली आहे. हा चित्रपट एका तरुणाची गोष्ट आहे. त्याची काही स्वप्न आहेत पण त्याच्या नशिबात काहीतरी वेगळेच आहे. वेद आणि विज्ञान यामधले नाते या चित्रपटात दाखवले आहे.

दशेहरा व्यतिरिक्त होसिंग यांनी उट पटांग (२०११) आणि जीना है तो ठोक डाल (२०१२) सारख्या हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. उट पटांग मध्ये सौरभ शुक्ल, विनय पाठक, संजय मिश्र, माही गिल हे कलाकार होते.

कानभट ची रिलीज डेट अजून निश्चित नाही.

Related topics

Poster review