News Hindi Tamil Telugu

प्रतीक बब्बर रजीनीकांत यांच्या दरबार मध्ये


ए आर मुरुगदास दिग्दर्शित चित्रपटात प्रतीक बब्बर खलनायकाच्या भूमिकेत.

फोटो-शटरबग्स फोटोज

Our Correspondent

ए आर मुरुगदास दिग्दर्शित रजीनीकांत यांच्या नवीन दरबार चित्रपटात प्रतीक बब्बर खलनायकाची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाची कथा मुंबईमध्ये घडते.

प्रतीक बब्बर यांनी आपल्या विधानात म्हटले, "इतक्या कमी वेळात एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये काम करणे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. हे वर्ष माझ्यासाठी सकारात्मक होते आणि सान्या माझ्या पत्नीचा माझ्या व्यक्तिगत आणि व्यावसाईक आयुष्यावर प्रभाव आहे. या आठवड्यात रजीनीकांत सर आणि मुरुगदास सरां बरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे."

गेल्या वर्षी बब्बर यांनी बाघी २, मुल्क आणि मित्रों या तीन चित्रपटात अभिनय केला होता. अनुभव सिन्हा दिग्दर्शित मुल्क मध्ये त्यांनी जिहादी बनलेल्या युवकाची भूमिका साकारली होती. फोर मोर शॉट्स प्लिज या अमेझॉन प्राइम सिरीज मध्ये सुद्धा त्यांनी काम केले होते.

या वर्षी बब्बर आपल्याला नितीश तिवारी यांच्या छिछोरे, महेश मांजरेकर दिग्दर्शित पावर आणि सिन्हा यांच्या अभी तो पार्टी शुरू हुई है मध्ये दिसतील.

लायका प्रोडक्शन्स निर्मित दरबार मध्ये नयनतारा सुद्धा दिसतील. पुढच्या वर्षी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेमध्ये हा चित्रपट रिलीज होईल.

Related topics