News Hindi

सलमान खान आणि कतरीना कैफ यांचा समुद्रप्रवास


सलमान खान नौदल अधिकाऱ्याच्या पोशाखात दिसत आहेत तर कतरीना ने सामान्य भारतीय पोशाख परिधान केला आहे.

Sonal Pandya

बुधवारी रिलीज केलेल्या भारत चित्रपटाच्या पोस्टरवर सलमान खान १९७०च्या दशकात खाणकाम करणारे कामगार म्हणून दिसले होते. गुरुवारी रिलीज केलेल्या नवीन पोस्टरवर ते नौदलच्या पोशाखात दिसत आहेत.

अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत या चित्रपटात सलमान खान आणि कतरीना कैफ प्रत्येक दशकात वेगवेगळ्या वेशात दिसणार आहेत.

मेरी मिट्टी मेरा देश असे लिहून सलमान खान ने ट्विटरवरून हे पोस्टर शेर केले.

नौदलाचा सफेद पोशाख आणि 'ईगल मरीन' असे लिहलेली टोपी असा सलमान खान चा पेहराव आहे. कतरीना कैफ साध्या भारतीय पेहरावात दिसत आहेत. सामान वाहून नेणारे जहाज सुद्धा पोस्टरवर दिसत आहे.

खान आणि कैफ व्यतिरिक्त भारत मध्ये तब्बू, जॅकी श्रॉफ, दिशा पटनी, सोनाली कुलकर्णी, सुनील ग्रोव्हर, नोरा फतेही आणि आसिफ शेख सुद्धा आहेत. ५ जून ला ईद च्या दिवशी हा चित्रपट रिलीज होईल.

Related topics

Poster review