वास्तव (१९९९) च्या धर्तीवर बनणाऱ्या पावर मध्ये विद्युत जमवाल प्रमुख भूमिका साकारणार.
महेश मांजरेकरांच्या पावर या गँगस्टर ड्रामा चित्रपटात विद्युत जमवाल
मुंबई - 20 Apr 2019 21:05 IST


Our Correspondent
महेश मांजरेकरांच्या पावर या गँगस्टर ड्रामा चित्रपटात आपल्याला विद्युत जमवाल प्रमुख भूमिकेत दिसतील. काही रिपोर्ट्सनुसार पावर मांजरेकरांच्या सुपरहिट चित्रपट वास्तव (१९९९) सारखाच असेल.
विजय गलानी चित्रपटाची निर्मिती करतील. त्यांनी नुकतेच एका मुलाखतीत म्हटले, "मी खूप खुश आहे की मी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाबरोबर काम करत आहे. हा एक ऍक्शनपट असणार आहे. विद्युत जमवाल ऍक्शनसाठी ओळखले जातात म्हणून ते या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील."
जमवाल ने नुकतेच चक रस्सेल दिग्दर्शित जंगली (२०१९) मध्ये काम केले होते. चित्रपटात त्यांनी हत्तींशी विशेष लगाव असलेल्या प्राण्यांच्या डॉक्टरची भूमिका साकारली होती.
मांजरेकरांनी नुकतेच भाई: व्यक्ती की वल्ली (२०१९) चित्रपटाचे दोन भाग दिग्दर्शित केले होते. सिटी ऑफ गोल्ड १९८२: एक अनकही कहानी (२०१०) नंतर मांजरेकर हिंदी चित्रपट दिग्दर्शनाकडे प्रथमच वळत आहेत.