News Marathi

मोगरा फुलला मध्ये नीना कुलकर्णी स्वप्नील जोशींच्या आईच्या भूमिकेत


श्राबनी देवधर दिग्दर्शित मोगरा फुलला १४ जून ला रिलीज होईल.

Our Correspondent

मोगरा फुलला चित्रपटाच्या नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरवर आई-मुलाच्या अतूट नाते दाखवले आहे. दिग्गज अभिनेत्री नीना कुलकर्णी स्वप्नी जोशींच्या आईची भूमिका साकारत आहेत.

आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेल्या स्वपील जोशींचे पोस्टर आपल्याला भावुक करते. या अगोदर रिलीज केलेल्या एका फोटोमध्ये स्वप्नील जोशी आपल्याला ऑफिसला जाणाऱ्या एका सामान्य व्यक्तीच्या वेशात दिसले होते.

चित्रपटाविषयी बोलताना नीना कुलकर्णी म्हणाल्या, "चित्रपटाची दिग्दर्शक श्राबनी माझी जुनी मैत्रीण असल्याने शूटिंग करताना मजा आली. मी १४ वर्षानंतर स्वप्नील जोशी बरोबर चित्रपटात काम करत आहे. ही एक हळवी आणि मनाला भिडणारी कथा आहे, त्यामुळे मला या चित्रपटात आईची भूमिका करण्यात समाधान मिळालं. निर्माते अर्जुन सिंह बारन आणि कार्तिक निशानदार यांचे मी खास आभार मानते की त्यांनी यासारख्या विषयावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला."

मोगरा फुलला मध्ये आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असल्याने समाजमान्य वयापेक्षा थोडा उशिरा प्रेमात पडणाऱ्या पुरुषाची कथा आहे.

प्रसिद्ध चित्रपट आणि नाट्य-दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सुद्धा या चित्रपटात अभिनय करत आहेत. नीना कुलकर्णी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांची ओळख जुनी आहे. "मी त्यांच्या काही नाटकांमध्ये अभिनय केला आहे, त्यामुळे आता त्यांच्याबरोबर अभिनय करण्याचा अनुभव वेगळा होता," कुलकर्णी म्हणाल्या.

श्राबनी देवधर दिग्दर्शित मोगरा फुलला १४ जून ला रिलीज होणार आहे.

Related topics