{ Page-Title / Story-Title }

News Marathi

कागर टीजर – रिंकू राजगुरु एका वेगळ्या भूमिकेत


मकरंद माने दिग्दर्शित हा चित्रपट राजकारणा भोवती फिरतो.

Keyur Seta

सैराट नंतर रिंकू राजगुरु यांना मोठ्या पडद्यावर पाहायची इच्छा आता ३ वर्षांनी पूर्ण झाली. दोन वेळा रिलीजची तारीख पुढे ढकलल्या नंतर आता शेवटी कागर ची रिलीज डेट निश्चित झाली आहे.

मकरंद माने दिग्दर्शित कागर २६ एप्रिल ला रिलीज होईल. योगायोगाची बाब म्हणजे सैराट २९ एप्रिल ला रिलीज झाला होता.

टीजर मध्ये रिंकू राजगुरु यांच्या पात्राविषयी आणि चित्रपटाच्या कथानकाविषयी माहिती मिळते. महाराष्ट्रातल्या विराईनगर गावात ही कथा घडते.

राजगुरु आपला प्रियकर (शुभंकर तावडे) याच्या बरोबर लग्न करणार आहे. तिचा प्रियकर राजकारणात आपली कारकीर्द बनवू इच्छितो. तिची सुद्धा त्याने राजकारणात खूप मोठं व्हावं हीच इच्छा आहे, पण तिचा त्याच्याशी लग्न करण्यामागे एक वेगळाच हेतू आहे हे आपल्याला नंतर लक्षात येते.

टीजरवरून तरी चित्रपटाचे कथानक खूपच इंटरेस्टिंग वाटते. पण इतका महत्वाचा ट्विस्ट टीजरमध्ये दाखवणे कितपत योग्य आहे? (ट्रेलरमध्ये आणखी किती ट्विस्ट दाखवतील याची भीती वाटते.) पुन्हा त्या ट्विस्टचा परिणाम काय होतो हे सुद्धा टीजरमध्ये दाखवले आहे.

या कठीण भूमिकेत सुद्धा राजगुरू कॉन्फिडन्ट दिसतात. तावडे प्रथमच प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. मकरंद मानेंचा दिग्दर्शक म्हणून हा तिसरा चित्रपट आहे. याअगोदर त्यांनी रिंगण (२०१७) आणि यंग्राड (२०१८) हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

चित्रपटाचा विषय लक्षात घेता लोकसभा निवडणुकीच्या काळात चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय अगदी योग्य आहे.

Related topics

Teaser review