{ Page-Title / Story-Title }

News Hindi

'जवानी गाणे' – प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते हे विशाल-शेखर यांच्या या गाण्यातून सिद्ध होते

Read in: English | Hindi


जवानी दिवानी च्या शीर्षक गीताचे नवीन व्हर्जन विशाल दादलानी आणि पायल देव यांनी गायले आहे.

Shriram Iyengar

नव्या पिढीसमोर जुने क्लासिक गाण्याची दुर्दशा केलेली पाहणे यापेक्षा दुःखद काही असू शकते का? आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या जवानी दिवानी चित्रपटाच्या शीर्षक गाण्याचा विशाल-शेखर यांनी स्टुडन्ट ऑफ द इयर २ साठी केलेल्या नवीन व्हर्जन वर टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, तारा सुटारीया डान्स करताना दिसतात. विशाल दादलानी आणि पायल देव यांनी हे गाणे गायले आहे.

विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीचे औचित्य असताना हे गाणे वाजवले जाते. स्टुडन्ट ऑफ द इयर (२०१२) मध्ये सुद्धा 'डिस्को दिवाने' अशाच प्रकारचे एक गाणे होते.

संपूर्ण गाण्याचे चित्रण पाहता हा धर्मा प्रोडक्शन चा चित्रपट आहे हे कोणीही सांगेल. टायगर श्रॉफ चमकदार कपड्यात दिसतात. संपूर्ण सेटच चमकदार रंगाने सजवला आहे. फैशनबल रेट्रो कपडे, रॉक कॉन्सर्ट स्टेज, ऍनिमे-शुनेन स्टाइल चा शाळेचा युनिफॉर्म हे सर्व पाहता हे गाणे म्हणजे एक फॅशन शोच आहे असे वाटायला लागते.

या गाण्यातून टायगर यांचे नृत्य-कौशल्य दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे आणि त्यांनी सुद्धा ही संधी दवडली नाही. एवढे सर्व असून सुद्धा नृत्य दिग्दर्शन थोडे फिकेच पडले आहे. पांडे आणि सुटारीया यांचे नवखेपण क्लोज-अप मध्ये दिसून येते.

टायगर श्रॉफ ने आपले नेहमीची शारीरिक लवचिकता या गाण्यात सुद्धा आपल्या नृत्यातून दाखवली आहे. सुरुवातीला काही क्षण दिसल्यानंतर आदित्य सील सुद्धा नंतर जास्त दिसत नाहीत. स्टुडन्ट ऑफ द इयर (२०१२) चे 'रियुनीयन' गाणे अधिक प्रभावशाली झाले होते असे हे गाणे पाहिल्यावर वाटते.

ऍनिमे स्टाइल चे कपडे घातल्याबद्दल टीका करणे अयोग्यच आहे. आर डी बर्मन यांचे स्वतः चाहते असलेले विशाल-शेखर यांनी झंकार बीट्स (२००३) मधून आर डी बर्मन यांना चांगला ट्रिब्यूट दिला होता. हे गाणे जरी झंकार बीट्स च्या दर्जाचे झाले नसले तरी गाणे वाईट नक्कीच नाही.

गाण्याच्या सुरुवातीचा जोश पाहता तुम्हाला हे गाणे आवडू लागते. दादलानी यांचा आवाज देखील गाण्याच्या एनर्जी ला मॅच करतो. पण नवीन व्हर्जन आणि जुने व्हर्जन च्या शिफ्ट मध्ये गाण्याची मजा कमी होते. किशोर कुमार यांचा सदाबहार आवाज आणि आर डी बर्मन यांचे संगीत तुम्हाला आवडणार नाही असे होऊ शकत नाही. पायल देव यांना जास्त वाव नसला तरी मिळालेल्या वेळात त्यांनी देखील आपली छाप सोडली आहे.

गाण्यात काही नवीन वाद्य आणि सेक्साफोन चा वापर करून त्याला आधुनिक करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याचा जास्त फरक पडत नाही. या नवीन व्हर्जनमध्ये जुन्या गाण्याची सहजता नाही. कदाचित हे मुद्दामच केले असावे. तरीदेखील गाणे गुणगुणण्यालायक झाले आहे. पण याचे श्रेय सुद्धा ग्रेट आर डी बर्मन यांनाच जाते.

स्टुडन्ट ऑफ द इयर २ चे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा यांनी केले आहे. गाण्याचे नवीन आणि जुने व्हर्जन खाली पहा.

 

Related topics

Song review