मुन्नी चे पात्र सुद्धा मिथुन सारखेच आहे. कोल्हापुरात राहणारी ती एक बिनधास्त स्वभावाची मुलगी आहे.
कश्मिरा परदेशी ला रम्पाट मध्ये अभिनय बेर्डे सारखंच स्टार होण्याची इच्छा
मुंबई - 15 Apr 2019 22:55 IST


Keyur Seta
रम्पाट चित्रपटातील अभिनय बेर्डे यांच्या पात्राची ओळख करून दिल्यानंतर रवी जाधव यांनी आणखी एका व्हिडिओतून चित्रपटाच्या नायिकेची ओळख करून दिली आहे. कश्मिरा परदेशी या चित्रपटात मुन्नी नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहेत.
मुन्नी चे पात्र सुद्धा मिथुन सारखेच आहे. कोल्हापुरात राहणारी ती एक बिनधास्त स्वभावाची मुलगी आहे. ती कुस्तीपटू आहे. बेर्डे यांच्या पात्राप्रमाणेच तिची सुद्धा मोठी फिल्म स्टार होण्याची आणि मोठ्या चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे.
परदेशी यांची ऊर्जा पाहता त्यांची या पात्रासाठी निवड करण्याचा निर्णय योग्यच होता असे म्हणता येईल.
परदेशी ने श्रीनिवास चक्रवर्ती दिग्दर्शित नर्तनसाला (२०१८) या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. रम्पाट हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या वर्षी त्या मिशन मंगल चित्रपटातून हिंदी चित्रपसृष्टीत सुद्धा पदार्पण करणार आहेत. जगन शक्ती दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू आणि दलीप ताहिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
न्यूड (२०१८) नंतर रवी जाधव आता रम्पाट हा चित्रपट घेऊन आले आहेत. कल्याणी मुळे आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेला न्यूड चित्रपट मुंबईतल्या जे जे कॉलेज ऑफ आर्टस् मधल्या न्यूड मॉडेल्सच्या जीवनावर आधारित आहे.
रम्पाट १७ मे ला रिलीज होणार आहे. खाली टीजर पहा आणि तुम्ही चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत का ते आम्हाला कळवा.