News Hindi

कुली नं १ च्या रिमेकवर वरुण धवन ने आपले मनोगत व्यक्त केले


वडील डेव्हिड धवन साठी या चित्रपटाचा रिमेक करणे फार अवघड असणार.

फोटो - शटरबग्स इमेजस

Keyur Seta

वरुण धवन वडील डेव्हिड धवन दिग्दर्शित १९९५चा सुपरहिट चित्रपट कुली नं १ च्या रीमेक मध्ये अभिनय करणार आहेत ही बातमी येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

कलंक बद्दल मीडियाशी बोलताना धवन ने सांगितले की प्रेक्षकांचा सोशल मीडियावर मिळालेला रिस्पॉन्स त्यांना अपेक्षित होता.

लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, काही लोकांना वाटतं की आम्ही हा चित्रपट बनवण्याची गरजच नाही. रीमेकचे दिग्दर्शन सुद्धा डेव्हिड धवन करणार आहेत. या पिता-पुत्र जोडीने अगोदर जुड़वां २ (२०१७) मध्ये सुद्धा एकत्र काम केले आहे. सलमान खान अभिनित जुड़वां (१९९७) चा हा रीमेक होता.

वरुण धवन यांना कुली नं १ खूप आवडला होता म्हणून रीमेक करायला त्यांनी तयारी दर्शवली होती. "मला तो चित्रपट खूपच आवडला होता कारण पूर्ण कौटुंबिक चित्रपट आहे. कुली नं १  माझ्या आवडत्या चित्रपटां पैकी एक आहे. चित्रपटाची पटकथा देखील छान लिहली होती. आणि त्या काळातल्या काही उत्कृष्ट अभिनेत्यांनी या चित्रपटात काम केले होते."

कुली नं १ मध्ये गोविंदा, करिष्मा कपूर, कादर खान, सदाशिव अमरापूरकर आणि हरीश हे कलाकार होते. एका श्रीमंत व्यक्ती (कादर खान) याच्या मुलीशी लग्न करण्यासाठी एक कुली (गोविंदा) श्रीमंत उद्योगपती असल्याचा नाटक करतो. पूर्ण प्लॅन शादिराम घरजोडे (अमरापूरकर) ने आखलेला असतो. कादर खान ने एकदा शादिरामचा अपमान केलेला आणि त्याचा बदला घेण्यासाठी तो हा प्लॅन आखतो.

वरूण ने सांगितले की कुली नं १ चा सीन टू सीन रीमेक न करता कथेमध्ये काही बदल सुद्धा करतील. "आम्ही चित्रपटाचा जशास तसा रीमेक न करता त्यात काही बदल करणार आहोत, त्या पद्धतीचे मनोरंजन पुन्हा नवीन पिढीसमोर आणण्यासाठी मी आणि माझे वडील हा चित्रपट करायला तयार झालो. त्यांनी कथेमध्ये खूप बदल केले आहेत," असं वरुण धवन म्हणाले.

Related topics