{ Page-Title / Story-Title }

News Hindi

स्टुडन्ट ऑफ द इयर २ ट्रेलर – बेस्ट स्टुडन्ट बनण्यासाठी टायगर श्रॉफ ने कसली कंबर


तारा सुटारिया आणि अनन्या पांडे यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण.

Sonal Pandya

स्टुडन्ट ऑफ द इयर २ चा ट्रेलर शुक्रवार दिनांक १२ एप्रिल रोजी रिलीज झाला. रोहन (टायगर श्रॉफ) ला सेंट टेरीसा कॉलेज चा डिग्निटी कप मिळवायचा आहे. रोहन, मिया (तारा सुटारिया) आणि श्रेया (अनन्या पांडे) या तिघांचा प्रेमाचा त्रिकोण सुद्धा कथेचा महत्वपूर्ण भाग आहे.

डिग्निटी कप मिळवण्यासाठी पिळदार शरीरयष्टी असलेले विद्यार्थीच भाग घेऊ शकतात असे वाटते. आठ-पॅक ऍब्स असलेले टायगर श्रॉफ ऑलम्पिक मध्ये भाग घेऊ शकतील अश्या करामती करताना दिसतात. शत्रू गोटाचा म्होरक्या (आदित्य सील) ह्याला मात्र रोहन ला कॉलेज मधून हाकललेलं पाहायचय आणि त्याची इच्छा लवकरच पूर्ण होते जेव्हा रोहन ला सेंट टेरीसा  मधून काढून टाकण्यात येते.

पण रोहन हार न मानता पिशोरीलाल चमनदास कॉलेज मधून डिग्निटी कप स्पर्धेत भाग घेतो. शांत स्वभावाचा रोहन सील ला तीक्ष्ण शब्दांत सुनावतो की दिवस तुझा असला तरी हे वर्ष माझे असेल.

कथेचा फोकस रोहन वर असल्यामुळे दोन्ही नवोदित अभिनेत्री सुंदर दिसण्या खेरीज काहीच करताना दिसत नाहीत. रोहनच्या प्रेयसी याखेरीज चित्रपटात दोघांच्या वाट्याला काही आलेले नाही.

फ्रँचाइज मधला हा दुसरा चित्रपट असल्याने सगळ्या गोष्टी पहिल्या चित्रपटापेक्षा भव्य दाखवल्या आहेत. अभिनेत्रींचे कपडे मात्र अधिक तोकडे झाले आहेत ही गोष्ट वेगळी.

अर्शद सय्यद यांनी हा चित्रपट लिहला असून पुनीत मल्होत्रा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. स्टुडन्ट ऑफ द इयर (२०१२) चे दिग्दर्शन करण जोहर ने केले होते. त्या चित्रपटातून इंडस्ट्रीला आलिया भट्ट, वरून धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे तीन नवीन चेहरे मीळाले होते.

स्टुडन्ट ऑफ द इयर २ ला विशाल-शेखर या जोडगोळीने संगीत दिले आहे. १० मे ला हा चित्रपट रिलीज होईल.

खाली ट्रेलर पहा आणि तुम्ही चित्रपट पाहणार का ते आम्हाला कळवा.

Related topics

Trailer review