News Hindi

सिद्धार्थ मल्होत्रा विरुद्ध कबड्डी खेळायला आवडेल – टायगर श्रॉफ


स्टुडन्ट ऑफ द इयर २ चा ट्रेलर लॉन्चच्या वेळी टायगर श्रॉफ म्हणाले की धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटात काम करायला मिळाले याचा त्यांना आनंद आहे.

Keyur Seta

मुंबईच्या मल्टिप्लेक्स मध्ये चाहत्यांच्या गर्दीत आज पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित स्टुडन्ट ऑफ द इयर २ चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. तारा सुटारीया आणि अनन्या पांडे या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

टायगर श्रॉफ म्हणाले की धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटात काम करायला मिळाले याचा त्यांना आनंद आहे. "धर्मा प्रोडक्शन सोबत काम करायला मिळतंय याबद्दल मी ऋणी आहे. हा माझा धर्मा प्रोडक्शन बरोबर पहिलाच चित्रपट आहे. स्टुडन्ट ऑफ द इयर २ ने याची सुरुवात झाली याचा जास्त आनंद आहे," असे श्रॉफ म्हणाले.

ट्रेलर पाहता हा चित्रपट सुद्धा टिपिकल करण जोहर च्या जातकुळीतला चित्रपट आहे हे लगेच कळते. सेंट टेरीसा कॉलेज मधून काढून टाकल्यानंतर श्रॉफ त्याचे कसे प्रत्युत्तर देतात याभोवती चित्रपटाची कथा फिरते.

पहिल्या चित्रपटात सुद्धा वरुण धवन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि काही इतर कलाकार स्टुडन्ट ऑफ द इयर ही ट्रॉफी मिळवण्यासाठी आपापसांत स्पर्धा करतात.

श्रॉफ यांना जेव्हा विचारले की तुम्हाला वरुण आणि सिद्धार्थ विरुद्ध कोणत्या खेळात भाग घ्यायला आवडेल, त्यांनी उत्तर दिले की "मला वरून विरुद्ध डान्स किंवा ऍथलेटिक्स च्या स्पर्धेत भाग घ्यायला आवडेल आणि सिद्धार्थ विरुद्ध मला कबड्डी खेळायला आवडेल कारण तो उंच आहे."

स्टुडन्ट ऑफ द इयर २ १० मे ला रिलीज होईल.

Related topics