News Hindi

सलमान खान च्या दबंग ३ चित्रपटाच्या शूटिंग चा कारभार संभाळणाऱ्या प्रोडक्शन कंपनीला ए एस आय ची नोटीस


इंदोरच्या एका किल्ल्यात शूटिंग दरम्यान काही मूर्तींचे नुकसान केले अशी प्रत्यक्षदर्शींनी तक्रार केल्यानंतर भारताच्या पुरातत्व खात्याने प्रोडक्शन कंपनीला नोटीस पाठवली आहे.

फोटो - शटरबग्स इमेजस

Our Correspondent

भारताच्या पुरातत्व खात्याने सलमान खान च्या दबंग ३ शूटिंग चा कारभार सांभाळणाऱ्या कंपनीविरुद्ध नोटीस जाहीर केली आहे.

पुरातत्व खात्याने प्रोडक्शन कंपनीला मध्य प्रदेशातल्या जल महालच्या इथे उभे केलेले दोन सेट्स काढून टाकायला सांगितले. जर लवकरात लवकर ते सेट्स तिथून काढून टाकले नाहीत तर त्यांचा त्या भागात शूटिंग करण्याचा परवाना रद्द करण्यात येईल.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया नुसार रवीवारी मेसर्स ड्रीम वर्ल्ड मुव्हीज प्रोडक्शन कंपनीला ही नोटीस पाठवण्यात आली. ऐतिहासिक स्मारक आणि पुरातत्व ठिकाण सर्वे ऍक्ट १९५८ चे उल्लंघन करून हा सेट उभारण्यात आला आहे असं त्या नोटीस मध्ये म्हटले आहे.

नर्मदा नदीकाठी मांडू नावाच्या किल्ल्यावर असलेल्या मूर्तींचे नुकसान केले हा देखील आरोप प्रोडक्शन कंपनीवर लावण्यात आला आहे. सलमान तिथे दबंग ३ चे शीर्षक गीत शूट करत होते.

प्रभू देवा दबंग ३ चे दिग्दर्शन करणार असून सलमान खान सोबत चित्रपटात सोनाक्षी सिंह सुद्धा नायिकेच्या भूमिकेत आहेत.

Related topics