{ Page-Title / Story-Title }

News Hindi

सैफ अली खान भूत पोलीस मध्ये अली फजल आणि फातिमा सना शेख यांच्यासह भूतांना पकडणार


पवन कृपलानी दिग्दर्शित हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. शेख आणि फजल पहिल्यांदाच हॉरर कॉमेडी मध्ये काम करणार.

Our Correspondent

पवन कृपलानी दिग्दर्शित भूत पोलीस मध्ये सैफ अली खान भूतांना पकडणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहेत.

चित्रपटाच्या फर्स्ट लुक मध्ये आपल्याला सैफ अली खान बरोबर अली फजल आणि फातिमा सना शेख सुद्धा दिसतात.

या वर्षी ऑगस्ट पासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. फजल ने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून चित्रपटाचे फर्स्ट लुक शेर केले. फर्स्ट लुक मध्ये तिघेही काळ्या बॅकग्राउंड समोर काळा चष्मा घालून उभे आहेत. 

फजल आणि खान यांच्या पेहरावा वरून ते भुतांना पकडण्याचे काम करतात असे वाटते. शेख दुसऱ्यांवर जादू करणाऱ्या स्त्री च्या भूमिकेत आहेत.

सैफ अली खान ने  या अगोदर सुद्धा गो गोवा गॉन (२०१३) या हॉरर कॉमेडी मध्ये काम केले आहे. त्यांना आपण शेवटचे बाजार (२०१८) चित्रपटात पहिले आहे.

खान या वर्षी जवानी जानेमन आणि पुढच्या वर्षी तानाजी: दि अनसंग वॉरिअर या चित्रपटात दिसतील.

फातिमा सना शेख ने थग्स ऑफ हिंदोस्तान (२०१८) मध्ये काम केले होते. अली फजल सुद्धा आपल्याला अमेझॉन प्राइम वर मिर्झापूर च्या दुसऱ्या सीजन मध्ये दिसतील.

Related topics

Poster review