{ Page-Title / Story-Title }

News Hindi

स्टुडन्ट ऑफ द इयर २ पोस्टर्स – टायगर, तारा आणि अनन्या कॉलेजच्या नवीन सत्रासाठी तयार


या चित्रपटातून इंडस्ट्रीला मिळणार दोन नवीन चेहरे.

Sonal Pandya

शुक्रवारी होणाऱ्या ट्रेलर लॉन्चच्या एक दिवस पूर्वी स्टुडन्ट ऑफ द इयर २ चे काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले. पोस्टर्स वर टायगर श्रॉफ बरोबर चित्रपटाच्या २ नायिका, तारा सुटारीया आणि अनन्या पांडे, सुद्धा दिसत आहेत.

करण जोहर ने आता पुनीत मल्होत्रा वर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली आहे. बुधवारी टायगर श्रॉफ चे एक पोस्टर रिलीज केले होते त्यात टायगर श्रॉफ सेंट टेरीसा कॉलेज च्या समोर उभे दिसत आहेत तर नवीन पोस्टर मध्ये टायगर एका ऍथलीट च्या भूमिकेत दिसत आहेत.

तारा सुटारीया आणि अनन्या पांडे या दोन नवीन चेहऱ्यांचे पोस्टर्स सुद्धा रिलीज केले आहेत. सुटारीया मीया नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहेत तर अनन्या च्या पात्राचे नाव श्रेया आहे. पोस्टर्स वरून वाटते की मिया शांत स्वभावाची आहे तर श्रेया चा स्वभाव खेळकर आहे.

पहिल्या चित्रपटाप्रमाणे या चित्रपटात सुद्धा ही तीन पात्रं सेंट टेरीसा कॉलेजचा बेस्ट स्टुडन्ट बनण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतील.

पहिल्या चित्रपटातील आलिया भट्ट, वरूण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटात सुद्धा पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसतील असे बोलले जात आहे.

धर्मा प्रोडक्शन्स निर्मित स्टुडन्ट ऑफ द इयर २ येत्या १० मे ला रिलीज होईल.

Related topics

Poster review