{ Page-Title / Story-Title }

News Tamil

रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेल्या दरबार चित्रपटाच्या शूटिंगला मुंबईत सुरुवात


१९९२ च्या पांडियन नंतर २७ वर्षांनी रजनीकांत दरबार मध्ये पोलीसच्या भूमिकेत दिसतील.

Haricharan Pudipeddi

बुधवारी मुंबईमध्ये रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला आणि ए आर मुरुगदास दिग्दर्शित दरबार च्या शूटिंग ला सुरुवात झाली. मंगळवारी दिग्दर्शक मुरुगदास यांनी ट्विटरवरून चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले.

पुढच्या वर्षी पोंगल मध्ये चित्रपट रिलीज होईल. १९९२ च्या पांडियन नंतर २७ वर्षांनी रजनीकांत दरबार मध्ये पोलीसच्या भूमिकेत दिसतील.

चित्रपटाचे पोस्टर पाहूनच लक्षात येते की ते चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारत आहेत. दरबार मध्ये नयनतारा प्रमुख नायिकेच्या भूमिकेत आहेत.

या थरारपटाची संपूर्ण शूटिंग मुंबईमध्येच होणार आहे. या अगोदर सन पिक्चर्स चित्रपटाची निर्मिती करणार होते, परंतु सरकार (२०१८) चित्रपटा वेळी झालेल्या विवादामुळे त्यांनी या चित्रपटातून माघार घेतली.

आता 2.0 (२०१८) चे निर्माते लायका प्रोडक्शन्स ने या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली आहे.

अनिरुद्ध रविचंदर संगीत दिग्दर्शन करणार असून संकलनाची जबाबदारी श्रीकर प्रसाद यांच्यावर आहे.

काहीच दिवसांपूर्वी प्रसिद्ध छायाचित्रकार संतोष सिवान यांनी आपणसुद्धा या चित्रपटाचा भाग असल्याची बातमी दिली होती.

रजनीकांत बरोबर काम करण्यास आपण खूप उत्सुक आहोत असे त्यांनी म्हटले. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी याबद्दल ट्वीट केले होते. ट्वीट मध्ये त्यांनी म्हटले की "थलपती नंतर पुन्हा रजनीकांत सरांबरोबर काम करण्यास मी खूप खूप उत्सुक आहे."

काला (२०१८) आणि 2.0 (२०१८) नंतर लायका प्रोडक्शनचा रजनीकांत बरोबर हा तिसरा चित्रपट आहे.

Related topics