{ Page-Title / Story-Title }

News Hindi

सी बी एफ सी ने पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाला यु सर्टिफिकेट दिले


चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घालण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या नंतर दुसऱ्याच दिवशी सी बी एफ सी ने चित्रपटाला सर्टिफिकेट देऊ केले.

Our Correspondent

सी बी एफ सी ने पीएम नरेंद्र मोदी या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बनलेल्या जीवनपटाला यु सर्टिफिकेट दिले. ओमंग कुमार बी दिग्दर्शित हा चित्रपट ११ एप्रिल ला रिलीज होईल. चित्रपटात विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदींची भूमिका करत आहेत.

इंडियनएक्सप्रेस.कॉम ला दिलेल्या मुलाखतीत निर्माते संदीप सिंह म्हणाले, "आम्हाला आनंद आहे की आमच्या चित्रपटाला यु सर्टिफिकेट मिळाले आणि आता ११ एप्रिल ला चित्रपट रिलीज होऊ शकतो. भारताच्या सुप्रीम कोर्टाने आणि निवडणूक आयोगाने आणि सी बी एफ सी या सर्वां कडून आमच्या चित्रपटाला क्लीन चिट मिळाली आहे. आशा आहे की आता कोणत्याच राजकीय पक्षाला आमच्या चित्रपटाविरुद्ध काही तक्रार नसेल. आमच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचा मी ऋणी आहे."

आचार संहितेचा भंग केल्याच्या आरोपाखाली विरोधी पक्षांकडून चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घालण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या नंतर दुसऱ्याच दिवशी सी बी एफ सी ने चित्रपटाला सर्टिफिकेट देऊ केले.

सुप्रीम कोर्टाने म्हटले या बाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. ३ एप्रिल ला निवडणूक आयोगाने म्हटले की सी बी एफ सी च्या नियमावलीत बसत असल्यास चित्रपटाचे रिलीज थांबवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे नाही.

पीएम नरेंद्र मोदी ११ एप्रिल ला रिलीज होणार आहे. याच दिवशी लोकसभेचे पहिल्या टप्प्याचे मतदान देखील होणार आहे. १९ मे पर्यंत मतदान प्रक्रिया चालू असणार.

Related topics