News Hindi

रोमिओ अकबर वॉल्टर मधले गाणे 'अल्लाहू अल्लाह' कर्णमधुर असले तरी लक्षवेधी नाही


मधुर कव्वाली या थरारपटामध्ये असंबद्ध वाटते. 

Sonal Pandya

रोमिओ अकबर वॉल्टर मध्ये 'अल्लाहू अल्लाह' ही कव्वाली जॉन एब्रहम आणि मौनी रॉय यांच्या पहिल्या भेटीचे निमित्त म्हणून वापरली आहे.

अकबर मलिक पाकिस्तान मध्ये गुप्तहेर म्हणून कार्यरत आहे आणि पाकिस्तानची हत्यारांची मोठी डील उध्वस्त करायची त्याच्यावर जबाबदारी आहे. या डीलची माहिती मिळवत असतानाच त्याची भेट मौनी रॉय शी होते.

समीर खान, मनीष सिंह, श्रेयस पुराणिक, जय मेहता, मयूर साखरे, तेजस माहुरे या गायकांनी मिळून ही कव्वाली गायली आहे. शब्बीर अहमद यांनी गाण्याला संगीत दिले असून गाण्याचे शब्द पण लिहले आहेत.

पण थरारपटाच्या टोनमध्ये ही कव्वाली बसत नाही. एकीकडे प्रेयसीची पुनर्भेट तर दुसरीकडे शत्रू गोटातली गुप्त माहिती मिळवून आपल्या देशाला पाठवणे अशी दृश्ये गाण्यात दिसत आहेत.

खूप वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्याला कव्वाली ऐकायला मिळाली नाही. कव्वाली चा लक्षवेधी उपयोग मै हूँ ना (२००४) मधल्या 'तुमसे मिलके दिलका है जो हाल' या गाण्यात केला होता.

रॉबी ग्रेवाल लिखित-दिग्दर्शित रोमिओ अकबर वॉल्टर ५ एप्रिल ला रिलीज झाला. गाणे खाली पहा.

Related topics

Song review