{ Page-Title / Story-Title }

News Hindi

लग्नानंतर प्रथमच रणवीर आणि दीपिका स्क्रीनवर विवाहित जोडपं म्हणून दिसणार


लग्नानंतर प्रथमच ते स्क्रीनवर एकत्र एका जाहिरातीत दिसणार आहेत.

फोटो - शटरबग्स इमेजस

Our Correspondent

गेल्या वर्षी झालेल्या लग्नानंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह प्रथमच स्क्रीनवर एकत्र दिसणार आहेत. पण हे कोणत्या चित्रपटासाठी नसून लॉईडच्या जाहिरातीसाठी असणार आहे.

जाहिराती विषयी निर्मात्यांनी सांगितले, "लॉईड ला असे वाटते की त्यांच्या ब्रॅण्डच्या जाहिरातींसाठी रणवीर आणि दीपिकाची निवड अगदी योग्य आहे. ब्रँडची नवीन कॅम्पेन 'खयाल राखेंगे, खुश रखेंगे' मध्ये रणवीर आणि दीपिकाची उत्कृष्ट केमिस्ट्री दिसून येते."

निर्मात्यांनी सांगितले की जाहिरातीमध्ये दोघे विवाहित जोडप्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. या जाहिरातीच्या कॅम्पेन मध्ये रणवीर-दीपिका च्या वैवाहिक आयुष्यात लॉईडचे प्रोडक्ट्स किती महत्वाची भूमिका बजवतात हे दाखवले जाणार आहे.

नुकतेच दीपिका पदुकोणने त्यांच्या जुना बॉयफ्रेंड रणबीर कपूर बरोबर सुद्धा जाहिरात केली आहे.

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी गोलियों की रासलीला – राम-लीला (२०१३), फाइंडिंग फेनी (२०१४) (रणवीर चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होते), बाजीराव मस्तानी (२०१५), पद्मावत (२०१८) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

Related topics