News Hindi

मर्दानी २ च्या शूटिंग ला सुरुवात. राणी मुखर्जींचा २१ वर्षाच्या खलनायकाशी सामना


मर्दानी २ चे दिग्दर्शन गोपी पुथरन करणार आहेत. त्यांनी या अगोदर मर्दानीची पटकथा लिहली होती.

Our Correspondent

मंगळवारी २६ मार्च ला राणी मुखर्जींनी मर्दानी २ साठी शूटिंग ला सुरुवात केली. हा चित्रपट २०१४ चा हिट ऍक्शनपट मर्दानी चा सिक्वेल आहे.

दुस्र्या भागाची निर्मिती सुद्धा त्यांचे पती आदित्य चोपड़ा यशराज फिल्म्स या त्यांच्या बॅनर खाली करत आहेत.

पण मर्दानी २ चे दिग्दर्शन गोपी पुथरन करणार आहेत. पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार यांनी केले होते. गोपी पुथरन यांनी मर्दानी ची पटकथा लिहली होती. तसेच त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केले होते.

प्रदीप सरकार दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स निर्मित लफंगे परिंदे (२०१०) चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद सर्व गोपी पुथरन यांनीच लिहले होते.

मर्दानीमध्ये राणी मुखर्जी मुंबई क्राइम ब्रांच च्या सीनियर इन्स्पेक्टर च्या भूमिकेत दिसल्या होत्या. चित्रपटात त्या मुले पळवणाऱ्या टोळीचा म्होरक्या विरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. त्या म्होरक्याची भूमिका ताहीर राज भसीन ने साकारली होती.

"यावेळी त्यांचा सामना २१ वर्षाच्या तरुण मुलाशी असणार आहे. आता त्यांचे प्रमोशन सुद्धा झाले आहे. त्यामुळे चित्रपटात त्या सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस च्या भूमिकेत दिसतील. चित्रपटातला खलनायक असलेला २१ वर्षाचा मुलगा अतिशय हुशार आणि निर्दयी आहे," असे निर्मात्यांनी सांगितले.

मर्दानी २ ची रिलीज डेट मात्र अजून घोषित केलेली नाही.

Related topics