News Hindi

'८३ मध्ये आर बद्री १२वा राखीव खेळाडू सुनील वाल्सन यांची भूमिका साकारणार आहेत


वाल्सन यांनी १९८३ विश्वचषकामध्ये एकही सामना खेळाला नव्हता.

Our Correspondent

'८३च्या कास्ट मध्ये आर बद्री या दक्षिण भारतीय अभिनेत्याची वर्णी लागली आहे. ते सुनील वाल्सन या गोलंदाजांची भूमिका साकारणार आहेत. निर्मात्यांनी त्यांच्या फेसबुक पेज वरून याची घोषणा केली. चित्रपटात भारताचा १९८३ विश्वचषक विजेत्या होण्याचा प्रवास दाखवणार आहेत.

वाल्सन डावखुरे जलदगती गोलंदाज होते. आंध्रप्रदेशातल्या सिकंदराबाद मध्ये ते राहायचे. १९८३ च्या विश्वचषक मध्ये एकही सामना न खेळलेले ते एकमेव भारतीय खेळाडू आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी दिल्ली आणि रेल्वे साठी ७५ सामन्यात २१२ विकेट्स घेतले.

१९९९ विश्वचषक सुरु होण्यापूर्वी त्यावेळची भारतीय टीम आणि १९८३ च्या टीम मध्ये मुंबईत एक मैत्रीपूर्ण सामना झाला होता, त्यावेळी १९८३ चे सर्व खेळाडू उपस्थित नसल्यामुळे वाल्सन तो सामना खेळले.

आता चालू आय पी एल सीजन मध्ये वाल्सन दिल्ली कॅपिटल्स चे कोच म्हणून कार्यरत आहेत.

'८३ मध्ये रणवीर सिंह ऑल राउंडर कपिल देवची भूमिका साकारत आहेत.  पंकज त्रिपाठी टीमचे मॅनेजर मानसिंह ची भूमिका साकारत असून अभिनेता चिराग पाटील त्यांचे वडील संदीप पाटीलची भूमिका साकारणार आहेत.

Related topics