Article Hindi

मणिकर्णिका रिव्ह्यू – कंगना रानौत विद्रोही राणीच्या भूमिकेत उशिरा का होईना आपला इम्पॅक्ट पाडतात

Read in: English | Hindi


दोन दिग्दर्शक असूनसुद्धा पहिला हाफ रेंगाळत चित्रपट पुढे जातो. दुसरा हाफ मात्र आपली पकड घेतो.

Shriram Iyengar

चित्रपट रिलीज होण्याअगोदरच कंगना रानौतने अगदी झाशीच्या राणी सारखे करणी सेनेला अगदी बेधडक शब्दात म्हटले होते की त्या माफी मागणार नाहीत. चित्रपटातील पात्रं आणि ते पात्र निभावणारा कलाकार यांचा इतका योग्य मेल फार क्वचितच जमून येतो.

मात्र असंबद्ध पटकथा, अगणित पात्रं आणि ड्रामाचा अभाव या सर्व कारणांमुळे मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाँसी चित्रपट आपली निराशा करतो. चित्रपटातील उत्तम साहस दृश्ये आणि देशभक्ती या दोनच गोष्टींमुळे चित्रपटात आपला इंटरेस्ट टिकून राहतो.

पहिल्यांदा आपली मणिकर्णिका (कंगना रानौत) बरोबर भेट होते ती वाराणसी मध्ये तिच्या नामकरण सोहळ्यात. सूत्रधार अमिताभ बच्चन यांच्या आवाजात आपल्याला कळते की मणिकर्णिका हे नाव एका प्रसिद्ध घाटावरून ठेवण्यात आले आहे. इतिहासात तिचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जाईल अशी भविष्यवाणी ज्योतिष करतात.

झाँसीचे राजा गंगाधरराव यांच्याशी माणिकर्णिकाचा विवाह होतो. युद्धकला आणि शास्त्रामध्ये निपुण अशी मणिकर्णिका ब्रिटिशांची ताईत बनलेल्या झाँसी मध्ये पुन्हा एकदा नवा जोश आणि उत्साह आणते.

ब्रिटिश आणि सदाशिवराव (झिशान अय्युब) ज्यांचा सिंहासहनावर अधिकार आहे त्यांना मात्र हे पटत नाही. म्हणून सदाशिवराव माणिकर्णिकाला सिंहासनावरून खाली उतरवण्याची योजना आखतात. अय्युब यांनी झाँसीच्या पराभवामध्ये महत्वात्ची भूमिका बजावणाऱ्या स्वार्थी सदाशिवरावची भूमिका उत्तम निभावली आहे परंतू त्यांच्या भूमिकेमध्ये काही विशेष नसल्यामुळे त्यांना आपले अभिनय कौशल्य दाखवण्याचा पूर्ण वाव मिळाला नाही.

विजेंद्र प्रसाद (बाहुबलीचे पटकथाकार) यांची पटकथा पहिल्या हाफमध्ये रेंगाळत पुढे जाते. मणिकर्णिकाचे कथानक आणि सोहराब मोदी यांच्या झाँसी की राणी (१९५३) याच्या कथानकात बरेच साम्य असले तरी या नवीन चित्रपटाची मांडणी फारच वेगळी आहे. मोदी यांनी आपल्या चित्रपटातून ईस्ट इंडिया कंपनी ने झाशीवर केलेला अन्याय हे १८५७ च्या उठावाचे कारण असल्याचे दाखवले होते तर रानौत यांच्या चित्रपटात ब्रिटिशांची असंवेदनशीलता हे उठावामागचे खरे कारण असल्याचे सांगितले आहे. इंग्रज अधिकारी शेतकऱ्यांची गुरे मारून खात आणि राज्यकर्त्यांचा अनादर करत असत असे चित्रपटात दाखवले आहे.

चित्रपटात सर्वच भारतीय उठावकर्ते चांगले आणि सर्वच ब्रिटिश अधिकारी वाईट असे दाखवण्याचे टाळले आहे. उठावाच्या काळात काही उठावकर्त्यांकडून ब्रिटिश महिला आणि मुलांवर केल्या जाणाऱ्या अत्याचारापासून राणी लक्ष्मीबाई त्यांना वाचवतात असेसुद्धा दाखवले आहे.

राणी लक्ष्मीबाई यांचे पात्र आणि त्यांची स्त्रीवादी विचारसरणी या गोष्टी दाखवण्यात चित्रपटाचा पहिला भाग खर्ची झाला आहे. एका सामान्य स्त्री सारखं रस्त्यावर फिरणे तसेच सामान्य गावकऱ्यांबरोबर नृत्य करणे यासारख्या काही गोष्टी क्रिएटिव्ह लायसन्स घेऊन दाखवल्या आहेत. लक्ष्मीबाईचे बाळंतपण, त्यांनतर पतीचा आणि बाळाचा मृत्यू या अत्यंत दुःखद घटनांचा आपल्यावर हवा तितका इमोशनल इम्पॅक्ट होत नाही.

झाँसीचे राजाच्या भूमिकेत जिषु सेनगुप्ता लक्षवेधी कामगिरी करू शकले नाहीत. बाकीची पात्रं तात्या टोपे (अतुल कुलकर्णी), झलकारी (अंकिता लोखंडे) यांनादेखील जास्त वाव मिळाला नाही. पहिल्या हाफमध्ये काही महत्वपूर्ण भूमिका नसलेले घौस खान (डॅनी डेंझोंगपा) अचानक दुसऱ्या हाफमध्ये एक महत्वपूर्ण योद्धा म्हणून आपल्या समोर येतात.

आजकाल सर्वच ऐतिहासिक चित्रपटांची सुरुवात 'नाट्यमयतेसाठी कथेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत' या डिस्क्लेमर ने होते. या चित्रपटात मात्र कंगना आणि क्रिश यांनी राणी लक्ष्मीबाईंची सुटका, नंतर तात्या टोपे यांच्याशी पुनर्भेट आणि ग्वालीयार येथील शेवटचे युद्ध या सर्व गोष्टी क्रमशः दाखवल्या आहेत.

प्रोडक्शन डिजाइन उत्तम झाले आहे. चित्रपटात दिसणारे किल्ले आणि युध्दमैदान आपले डोळे दिपवून टाकतात.

पहिल्या हाफ मध्ये राज्याच्या राजकारणात हळूहळू आपले बस्तान बसवू पाहणाऱ्या लक्ष्मीबाई साकारताना कंगना तितकासा प्रभाव पाडू शकल्या नाहीत. सेनगुप्ता यांच्याबरोबर कंगनाचे असलेले काही रोमँटिक सीन्स सुद्धा आपल्याला जास्त भावत नाहीत.

कंगनाचे काही उच्चर थोडे खटकतात पण दुसऱ्या हाफमध्ये त्या आपली चूक लगेच सुधारतात. आपल्या बाळाच्या मृत्यूचे दुःख व्यक्त करताना मात्र कांगनांचा अभिनय थोडा मेलोड्रॅमॅटिक झालाय. पण दुसऱ्या हाफ मध्ये मात्र त्यांनी उत्तम संवादफेक केली आहे. दुसऱ्या हाफ मधली साहसदृश्ये सुद्धा उत्तमच जमून आली आहेत. शेवटच्या युद्धाच्या दृश्यांमध्ये रानौत आपल्याला इम्प्रेस करून जातात.

बाकीच्या अभिनेत्यांपैकी अंकिता लोखंडेने ठीक अभिनय केला आहे. डॅनी आणि अतुल कुलकर्णी यांना दुसऱ्या हाफमध्ये थोडी संधी मिळाली आहे. तरीही कंगनाचा अभिनय सर्वात जास्त लक्षात राहतो.

जनरल ह्यू रोसच्या भूमिकेत असलेले अभिनेते रिचर्ड कीप यांनी मात्र उत्तम अभिनय केला आहे. पडद्यावर अत्यंत क्रूर आणि निर्दयी दिसण्याखेरीज त्यांना जास्त काहीच करायचे नव्हते आणि त्यांनी ते अगदी उत्तमच निभावले. 

चित्रपटाच्या कंटिन्यूटी मध्ये सुद्धा काही चुका झाल्या आहेत. ब्रिटिश अधिकारी अमेरिकन ऍक्सेंट मध्ये बोलणे, तसेच शेवटच्या युद्धामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांचा युनिफॉर्म इंग्रजी रेड पासून फ्रेंच ब्लु होणे अश्या काही अतार्किक गोष्टी पाहिल्यावर तुमचे लक्ष विचलित होते. चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंचे स्वतंत्र भारताचे स्वप्न आणि त्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध उभारलेला लढा या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत परंतू त्या दाखवताना देशभक्ती या भावानेचा थोडा अतिवापर केला आहे असे वाटत राहते.

कथा इंटरेस्टिंग असली तरी मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाँसी हा चित्रपट आणखी उत्तम होऊ शकला असता.

Related topics